पायलट काका,पायलट काका


पायलट काका,पायलट काका,

पायलट काका,पायलट काका,

किती तुम्ही शूर,

Direct हवेतून विमान नेता किती तुम्ही दूर.

पायलट काका,पायलट काका,

किती fast जाता तुम्ही,

वेगवेगळ्या देशांना पटकन भेटून येता तुम्ही.

पायलट काका,पायलट काका,

किती प्रेमळ आहात तुम्ही,

विमानातल्या सगळ्यांना जपून नेता तुम्ही.

पायलट काका,पायलट काका,

माझं एक काम कराल का?

दूरदेशीच्या माझ्या दादाला

भेटून तुम्ही याल का?

आठवण त्याची येते खूप

असं त्याला सांगाल का?

नाहीतर,काका,काकू,दादाला

बरोबर घेऊन याल का?

पायलट काका,पायलट काका,

असं तुम्ही केलंत तर

एक बक्षीस तुम्हाला देईन,

माझ्या रंगीत खडूंपैकी,दोन आख्खे खडू तुम्हाला देईन.

पायलट काका,पायलट काका, Thank you.”

Audio Recording

(Recorded by: Pranoti)

ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा