एकदा काय झाले, स्वप्नात माझ्या आले.
स्वप्नात माझ्या वाघोबा आले,
कोल्होबा आले आणि सगळे ...बा,....बा
...आणि ...बा
पण मी मुळीच नाही घाबरले,
Spiderman ची आठवण केली, हातातून कितीतरी जाळी निघाली
वाघोबा बिघोबा सगळे त्यात अडकूनच गेले.हो..हो.. अडकूनच गेले
एकदा काय झाले, स्वप्नात माझ्या आले.
स्वप्नात माझ्या अमिताभ आजोबा आले.
खूप खेळले,गाणी म्हटली,मजा मजा केली.
म्हणाले,आराध्याची ही मैत्रीण
आम्हाला खूप आवडली.
मी म्हटलं,मग आराध्याशी खेळायला येऊ
का तुमच्या घरी?
सिनेमात तुमच्या काम द्याल तरच आपली
मैत्री खरी!
पण हे काय आजोबा कुठे गेले? बघता,बघता,अमिताभ आजोबा नाहीसे झाले,
मी सांगते,तुमच्या कानात सांगते,
मला घाबरून ते किनई पळूनच गेले हो..
हो.. पळूनच गेले
स्वप्नात माझ्या आई आली.
जवळ असून आई माझ्या स्वप्नात कशी
आली हो..हो... स्वप्नात कशी आली?
मला आठवलं,मला आठवलं,
पिंकीचे आजोबा देवाकडे गेले, आणि एक दिवस पिंकीच्या स्वप्नात ते आले.
म्हणजे आई माझी,माझी आई ..? नाही...नाही...नाही...
स्वप्नात काय आले,राजा,स्वप्नात काय आले?
वाघोबा,बिघोबा
का तुझ्या स्वप्नात आले?
का चोर भुताने
तुला घाबरवले?
स्वप्नात काय
आले,राजा,स्वप्नात काय आले?
स्वप्नातच कसा,घाबरला
माझा ससा
कुशीतच आणखी
शिरला माझा ससा...
आई माझी,माझी आई,
मला सोडून तू आई कुठेही जायचं नाहीस,
स्वप्नातसुद्धा तू आई,देवाकडे जायचं
नाहीस.
आई माझी आई, आई,आई,आई.
Audio Recording
ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा