पायलट काका,पायलट काका,
पायलट
काका,पायलट काका,
किती
तुम्ही शूर,
Direct
हवेतून विमान नेता किती तुम्ही दूर.
पायलट
काका,पायलट काका,
किती
fast जाता तुम्ही,
वेगवेगळ्या
देशांना पटकन भेटून येता तुम्ही.
पायलट
काका,पायलट काका,
किती
प्रेमळ आहात तुम्ही,
विमानातल्या
सगळ्यांना जपून नेता तुम्ही.
पायलट
काका,पायलट काका,
माझं
एक काम कराल का?
दूरदेशीच्या
माझ्या दादाला
भेटून
तुम्ही याल का?
आठवण
त्याची येते खूप
असं
त्याला सांगाल का?
नाहीतर,काका,काकू,दादाला
बरोबर
घेऊन याल का?
पायलट
काका,पायलट काका,
असं
तुम्ही केलंत तर
एक
बक्षीस तुम्हाला देईन,
माझ्या
रंगीत खडूंपैकी,दोन आख्खे खडू तुम्हाला देईन.
पायलट
काका,पायलट काका, Thank you.”
Audio Recording
(Recorded by: Pranoti)
ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)
लिखाण खूपच गोड आणि त्याहूनही गोड प्रणोतीचा आवाज!
उत्तर द्याहटवाक्या बात है....