समिंदरा रे समिंदरा ,
समिंदरा
रे समिंदरा, माझ्या लाडक्या मैतरा ,
इथून
तितका,तिथून इतका,असशी किती तू मोठा,
उसळती
त्यात सतत,किती उंच उंच लाटा
खेळताना
पाण्यात मजा वाटे,येई आनंद खरा...समिंदरा रे समिंदरा,माझ्या
लाडक्या मैतरा
कितीक
मासे,कितीक जलचर खेळती तुझ्यासंगे,
कितीक
अनमोल रत्ने लपविशी, तू तुझ्या
अंतरंगे,
कसला
भारी रुबाब तुझा,जरी मनी दरारा ..... समिंदरा
रे समिंदरा,माझ्या लाडक्या मैतरा
नेतोस
सूर्यदेवाला, रोज कोणत्या रे गावा,
सांज
संपता,गाज ऐकता,तुलाच रे आठवावा,
आकाशीचे मोहक रंग, अदभूत तो नजारा ..... समिंदरा रे समिंदरा,माझ्या लाडक्या मैतरा.
Audio Recording
(Recorded by: Jyoti Gandhe)
ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)
Nice poem!
उत्तर द्याहटवाछान आहे कविता.
उत्तर द्याहटवा