अशी काय ग आजी तू
अशी काय ग आजी तू? अशी काय ग आजी,
मोठ्या कॉलेजात शिकवत होतीस,
तरी कॉम्पुटर मधलं सोप्पं सोप्पंही,
तुला कसं ग
काही समजत नाही?
अशी काय ग आजी तू? अशी काय ग आजी,
एवढी मोठी झालीस तरी,
गुळदाण्याचा लाडू,अन पोह्याचा भात
तुला काहीच कसं येत नाही?
अशी काय ग आजी तू? अशी काय ग आजी?
शोधून शोधून दमतेस पण
एकदा सुद्धा पकडत नाहीस
अशी काय ग आजी तू? अशी काय ग आजी?
निळ्या डोळ्यांची अन छान सोनेरी
केसांची
तुला कधीच कशी ग दिसत नाही?
अशी काय ग आजी तू? अशी काय ग आजी?
रोज नव्या गोष्टी सांगूनही
तुझ्या गोष्टी संपत नाहीत,
अन कुशीत तुझ्या झोपल्यावर
थंडी कशी वाजत नाही?
अशी कशी ग तू आजी, अशी कशी ग तू आजी!
Audio Recording
(Recorded by: Sawani Datye)
ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

मस्त ...लेखनही आणि कवितावाचन ही.
उत्तर द्याहटवा