ससा घाबरला


ससा घाबरला...

एक होता ससा,

गुब्बू,गुब्बू ससा.

एक दिवस असा आला

कुणीच नव्हतं खेळायला,

एकटा खेळून कंटाळला,

मग लागला जांभया द्यायला.

तेवढ्यात तिकडून आई आली,

रागारागाने खूप ओरडली,

म्हणाली,असलं कसलं तुझं लोळणं?

काहीच नाही करणं,

आणि आळशासारखं बसणं?

केवढा घातलायस हा पसारा.

पटपट आवर तो सारा.”

ससा बिचारा उठला,

पसारा आवरायला लागला.

आवरता,आवरता त्याला सापडली एक वही,

मनीमाऊ,खारुताईचं चित्र काढलेली वही.

म्हणाला,आता मस्त वाघोबाचं चित्र काढू या,

मोठी शेपटी आणि छान छान पट्टे रंगवूया”.

चित्र काढता काढता हरपले भान,

पण वाघोबाचं चित्र मात्र झाले खूप छान!

तेवढ्यात वाघोबाची डरकाळी ऐकू आली,

गुब्बुची भीतीनी गाळण उडाली.

ससा घाबरला,पसारा तसाच टाकला,

पळापळ करू लागला,

धावाधाव करू लागला.

शेवटी अंगणात त्याला आई दिसली,

गुब्बुने आईला जाऊन मिठीच मारली, मिठीच मारली.

Audio Recording

- ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा