लेखायतन

‘लेखायतन’ हे नाव माझ्या ब्लॉगसाठी निश्चित केलं आणि मला आतून बरं वाटलं. पंचायतनशी साम्य असणारं नाव म्हणून छान वाटलं.पंचायतन,पाच देवतांची,सूर्य,गणेश,विष्णू,शिव आणि देवी यांची मंदिरं एकत्र असणारं देऊळ.त्यांच पावित्र्य माझ्या,लेख म्हणजे लिहिलेल्या सर्व लेखनप्रकारांना लाभो अशी प्रार्थना.

‘लेखायतन’ या माझ्या ब्लॉगमधे तीन विभाग असणार आहेत, पहिला ‘कवितांचा’,पण ह्या कविता लिहिताना आधी किंवा नंतर माझ्या मनातलं काहीतरी पूर्वपीठीका, मत,विचार काहीतरी भाष्य असणार आहे.

दुसरा विभाग ‘दुधावरच्या सायीसाठी’, अर्थात मुलांसाठी,कविता,गाणी,गोष्टी काहीही.तुम्ही वाचा,मुलांना वाचायला द्या,वाचून दाखवा,किवा थोडक्यात सांगा.त्यांच्या आईवडलांच्या मुलांवर संस्कार करण्याच्या प्रयत्नात एक खारीचा वाटा. 

छाेट्या दाेस्तांसाठी गाेष्टींच्या अखेरीस ऑडियाे देखील उपलब्ध आहे. छोटुकल्यांना जरुर ऐकवा.

तिसरा विभाग ‘मनकथन’. म्हणजे माझ्या मनात जे येईल,ज्या प्रकारे व्यक्त व्हावेसे वाटेल त्या,म्हणजे लेख,कथा,स्फुट असं काहीही.फक्त ‘या हृदयीचे त्या हृदयी‘जाण्यासाठी ज्या माध्यमप्रकारातून व्यक्त व्हावेसे वाटेल,ते त्यात असेल.

तेव्हा जरूर वाचा, प्रतिसाद द्या, सूचनाही आवडतील,तुमच्या जवळच्यांना पाठवा आणि हो, subscribe ही करा.

धन्यवाद!

-ज्योती .    

टिप्पण्या

  1. Fअतिशय सुंदर नाव लेखायतन जसे की पंचायतनशी साम्य . जस देवतांच पंचायतन तसच मला वाटत सारस्वताच म्हणजे साहित्याच हि पंचायतन ज्यात असेल भाषा विचार संस्कार प्रतिभा आणि परिणाम . प्रत्यक्ष लेखायतन चे पंचायतन म्हणजे गदय पदय कथन लिपी संवाद . मला वाटत या दोन पंचायतनात तुमचे लेखायतन छान बसेल . पुढील प्रवासाला छान शुभेच्छा . लागणाऱ्या हातभारांचे कौतुक .

    उत्तर द्याहटवा
  2. पाच बोटांनी होणार तुमचं लिखाण...आणि त्यासाठी तुम्हाला नेहमीच...★★★★★मिळू दे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूपच छान प्रेरणादायी प्रतिक्रिया,लेखायतन वाचत राहा आणि सांगत राहा आपल्या लेखायतन बद्दल.

      हटवा
  3. ज्योती ब्लाॅगचे नाव वाचल्यावर माझ्याही मनात
    पंचायतनच आले होते.छान संकल्पना.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान आहे...ज्योती....अर्थपूर्ण आहे....नांवातूनच तुझी प्रगल्भता जाणवते..तुझा अनुभव जाणवतो. आई बापूंचा आणि माझाही आशिर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहेत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो,दादा,म्हणूनच सुरवात केलीय.आशीर्वाद आणि प्रोत्साहन देत रहा.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा