लेखायतन



‘लेखायतन’ हे नाव माझ्या ब्लॉगसाठी निश्चित केलं आणि मला आतून बरं वाटलं. पंचायतनशी साम्य असणारं नाव म्हणून छान वाटलं.पंचायतन,पाच देवतांची,सूर्य,गणेश,विष्णू,शिव आणि देवी यांची मंदिरं एकत्र असणारं देऊळ.त्यांच पावित्र्य माझ्या,लेख म्हणजे लिहिलेल्या सर्व लेखनप्रकारांना लाभो अशी प्रार्थना.

‘लेखायतन’ या माझ्या ब्लॉगमधे तीन विभाग असणार आहेत, पहिला ‘कवितांचा’,पण ह्या कविता लिहिताना आधी किंवा नंतर माझ्या मनातलं काहीतरी पूर्वपीठीका, मत,विचार काहीतरी भाष्य असणार आहे.

दुसरा विभाग ‘दुधावरच्या सायीसाठी’, अर्थात मुलांसाठी,कविता,गाणी,गोष्टी काहीही.तुम्ही वाचा,मुलांना वाचायला द्या,वाचून दाखवा,किवा थोडक्यात सांगा.त्यांच्या आईवडलांच्या मुलांवर संस्कार करण्याच्या प्रयत्नात एक खारीचा वाटा.

तिसरा विभाग ‘मनकथन’. म्हणजे माझ्या मनात जे येईल,ज्या प्रकारे व्यक्त व्हावेसे वाटेल त्या,म्हणजे लेख,कथा,स्फुट असं काहीही.फक्त ‘या हृदयीचे त्या हृदयी‘जाण्यासाठी ज्या माध्यमप्रकारातून व्यक्त व्हावेसे वाटेल,ते त्यात असेल.

तेव्हा जरूर वाचा, प्रतिसाद द्या, सूचनाही आवडतील,तुमच्या जवळच्यांना पाठवा आणि हो,subscribeही करा.

धन्यवाद!

-ज्योती .    


टिप्पण्या