मला कळलेची नाही ...


मला कळलेची नाही 

मोहविले मला कसे त्या शब्दांनी, मला उमजलेची नाही,

अर्थ त्यांचा कसा तीव्र जहरी, ते मला समजलेची नाही …

भुलविले मला कसे त्या डोळ्यांनी, मला उमगलेची नाही,

ते भाव कसे असती खोटे, ते मला जाणवलेची नाही …

झुलविले कसे त्या स्पर्शानी, मला सुचलेची नाही,

हेत त्यातले कसे स्वार्थी, ते मला दिसलेची नाही…

गुंतविले कसे मला त्या हास्यानी, माझी मी उरलेची नाही,

डंख मारले आतुनी कितीही, ते मला कळलेची नाही…

बेगडी वागणे, कोणास फसवणे, मला कधी रुचलेची नाही, 

म्हणे, मी मलाच बदलावे, ते मला कधी जमलेची नाही…

ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)


टिप्पण्या

  1. खूप छान वाटली कविता. मला उमजलेच नाही किंवा मला कळलेच नाही हा अनुभव अनेक वेळा येतो. असे होते की आपण अनेक गोष्टी जशा दिसतात तशा समजतो पण कित्येक गोष्टींचा आपल्याला अंदाज येईपर्यंत आणि त्या कळेपर्यंत खूप उशीर होऊन गेलेला असतो. कुठेतरी आपणच लोकांच्या भावना समजण्यात कमी पडतो. मनाला खूप भिडली ही कविता. - उज्ज्वला

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा