खरं सांगतो ......

खरं सांगतो ......

खरं सांगतो, लॉकडाऊनमधे आम्ही मजा,मजा करतो.

आई करते काम तिच्या laptop वर,

बाबाही करतात, WFH (work from home) त्यांच्या mobile वर,

मीही माझ्या नव्या स्मार्ट फोनवर,

school from home करतो.

खरं सांगतो, लॉकडाऊनमधे आम्ही मजा, मजा करतो.

Online कसले, कसले, क्लासेस करतो,

 IPL live, मस्त enjoy करतो,

zoom मीटिंगमधे chatही करतो,

आईच्या नव्या रेसिपीजवर खूप ताव मारतो,

खरं सांगतो, लॉकडाऊनमधे आम्ही मजा, मजा करतो.

पण गावी असलेल्या आजीच्या गोष्टी ऐकणं,

आजोबांबरोबर खूप लांब walkला जाणं,

दोस्तांबरोबर शाळेत धमाल मस्ती करणं,

आम्ही खूप,खूप,खूपच miss करतो,

खरं सांगतो, लॉकडाऊनमधे आम्ही मजा,मजा करतो,

पण छानसं असं खूप काही,आम्ही खरच miss करतो, आम्ही खरच miss करतो.

Audio Recording

(Recorded by: Amogh Virkar)

-ज्योतीG (jyotigandhe28@gmail.com)

टिप्पण्या

  1. या कठीण काळातही मुलं अनेक गोष्टी शिकली, त्यांनी अनेक नवीन अनुभव घेतले आणि अनेक गोष्टींकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही त्यांना मिळाला. मुलांनी खूप काही कमावलं आणि बरंच काही गमावलं देखील. या दोन्ही गोष्टींचं अत्यंत सुंदर चित्रण या कवितेत आलेले आहे. पण मला सर्वात जास्त कौतुक वाटतं ते अमोघचं. अमोघने ही कविता अतिशय सुंदर वाचली आहे. अमोघ, खूप खूप छान. अशी एखादी कविता प्रत्येक वेळीच वाचत जा..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा