हे आव्हान मी स्वतःहून स्वीकारतेय.आनंदानी
स्वीकारतेय.हे करण्यासाठी मला प्रोत्साहित करणाऱ्या माझ्या बहिणी, मुली खरं म्हटलं
तर माझे सर्व कुटुंबीय,अगदी विविध नात्यांनी जोडलेल्या ग्रुपमधील विस्तारित
कुटुंबियांना प्रथम अभिवादन!
आपल्या सर्वांना सतत काहीतरी
सुचत असतं,एकमेकांशी बोलावसं वाटत असतं.कुणालातरी सांगावंसं वाटतं न, त्याच
साध्या,सरळ भावनेतून मी माझा स्वतःचा blog सुरु करायचं ठरवलं आणि ते प्रत्यक्षात
सुरु करताना मला असं जाणवतंय की माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे हा. माझ्या
दोन्ही मुलींच्या जन्मा इतकाच हा आनंदाचा क्षण आहे हा.आपण त्यांना जन्म दिला ह्यापेक्षा
त्या क्षणांनी आपल्यालाच खूप काही दिलेलं असतं,वेगळाच आनंद दिलेला असतो, तो मोठा
असतो.
आयुष्यातली आपली कर्तव्यं पार
पडली की एक निवांतपणा येतो.सगळीकडे पहायची दृष्टीच बदलून जाते. आता वाटतंय की कसं
पेललं आपण? पण आयुष्यात येणारे परीक्षेचे ते क्षणही आपल्याला शिकवतात,मोठं
करतात.म्हणून आता वाटतं,खरा प्रत्येक क्षण त्यादृष्टीने आनंदाचाच म्हणायला हवा.आपण
रागावतो,भांडतो. ती तर मनुष्य प्रवृत्ती आहे.पण नंतर स्वतःला अलिप्त करून बाजूंनी
सर्व विचार केला तर जाणवू शकतं की नसतो भांडलो,रागावलो तरी चाललं असतं,पण हे
आपल्याला आपलं भांडण,रागच शिकवतो,त्यामुळे त्यात हरकत नसते,विकोपाचं होणार नाही
ह्याची काळजी मात्र घ्यायला हवी,आणि रागही आपल्याला सतत येतोय,फार जास्त येतोय असं
होत असेल तर मात्र आपणच आपल्याकडे खूप वेगळ्या दृष्टीनी पाहायला हवं. मुख्य म्हणजे
स्वतःकडे अलिप्त होऊन बघायला हवं आणि त्यावर कामही करायला हवं.काही वेळेला भांडण आपल्याला वेगळा
दृष्टीकोनही देऊन जाते,समोरच्याच्या मनात काय चाललंय हेही सांगते त्यामुळे त्यांची
मतं,विचार हे ही समजून आपणही वेगळा विचार करू शकतो त्यामुळे भांडणांनी,रागानीही शिकवलेलं
विसरायचं नसतं,म्हणजे ते क्षणही मोलाचे,आनंदाचे
ठरतात तेव्हा प्रत्येक क्षण आनंदाचा करू या, ‘मुश्कील जरूर है पर नामुमकीन
नही|’
थोडक्यात काय ‘ Be Positive,Stay
Positive,Stay happy!’ परस्परांना आनंद देऊ या.
वाचत रहा माझं ‘लेखायतन’! Like,Share,Subscribe करालच! धन्यवाद!
प्रास्ताविक छान वाटल . मांडणी पण छानच आहे .
उत्तर द्याहटवा